पण 🐍 सापावर आयोजंकान कडून अन्याय : सबसे कातिल गौतमी पाटीलची वाढती क्रेझ पाहून चक्क साप 🐍 कार्यक्रमास हजर

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सबसे कातिल गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांची दिवसांन दिवस डान्सची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे.व तिच्या कार्यक्रमास पाय ठेवण्यासाठी देखील जागा नसते.हे सर्व पाहून बिचाऱ्या 🐍 सापाला देखील डान्स बघण्याची इच्छा झाली व तो आपले घर म्हणजे जंगल येथून मजल दर मजल करत कार्यक्रम स्थळी हजर झाला पंरंतु आयोजकांनी त्याला कार्यक्रम बघू न देता सर्प मित्र बोलवून त्या बिचाऱ्या सापावर कार्यक्रम बघू न देता त्याला तेथून पकडून त्याचा घरी जंगलात सोडून दिले.
दरम्यान याबाबत घडलेली घटना खरी आहे.मुंबई मधील कामोठे मानसरोवर रेल्वे स्टेशन जवळ सबसे कातिल गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पण चक्क कार्यक्रम सुरु असताना साप 🐍 कार्यक्रमात घुसला त्यामुळे एकच खळबळ उडाली त्यानंतर आयोजक यांनी सर्पमित्राला बोलवून या सापाला पकडून नेले व त्या नंतर गौतमी पाटील हिचा कार्यक्रम सुरू झाला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.