Complaint against Chitra Wagh : चित्र वाघ विरोधात केली ह्या अभिनेत्रीने तक्रार दाखल.

मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद हिला हानी पोहोचवण्यासाठी धमकावणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल चित्रा वाघ यांच्याविरोधात आता उर्फीच्या वकीलांनी तक्रार दाखल केली आहे. मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी टीका केली होती. जिथे सापडेल तिथे उर्फीला थोबडवण्याचा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. इतकंच नाही तर भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली होती. भाजप नेत्या चित्रा किशोर वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद वाढताना दिसून येत आहे.
अशातच सातत्याने चित्रा वाघ यांना डिवचणाऱ्या उर्फी हिने आता महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.
त्यानंतर अॅड. नितीन सातपुते यांनी चित्रा वाघ यांच्या विरुद्ध विविध गुन्ह्यासाठी आणि मॉडेल, अभिनेत्री उर्फीला हानी पोहोचवण्यासाठी धमकावणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
उर्फी हिने सार्वजनिक डोमेनवर तसेच Cr.P.C च्या 149 आणि 107 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची विनंती केली आहे. चित्रा वाघ या सतत मीडियावर धमक्या देऊन समाजातील शांतता भंग करत असल्याने तिच्याविरुद्ध प्रकरणाची कार्यवाही करावी, अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच अॅड. सातपुते महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.