Health department recruitment : महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागात १,००,२७ जागांची भरती - गिरीश महाजन

महाराष्ट्र राज्य सरकारने आरोग्य विभागातील भरतीबाबत आज मोठी घोषणा केली आहे. आरोग्य विभागात तब्बल १,००,२७ जागांची भरती केली जाणार आहे. दरम्यान विविध पदांचा समावेश असणार आहे. या भरतीबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री धडाडीचे ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनयांनी केली आहे.
आरोग्य विभागातील भरतीच्या या घोषणेमुळे राज्यातील अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. भरतीची जाहीरात १ जानेवारी ते ७ जानेवारी पुढील वर्षी २०२३ दरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर पुढील वर्षी २६ मार्च ते २७ मार्च २०२३ ला परीक्षा होणार आहे.
सध्याच्या या काळातच आरोग्य यंत्रणेवर चांगलाच ताण आला होता. आता या आरोग्य कर्मचांऱ्यांवर अधिकचा ताण येऊ नये म्हणून सरकारने या भरतीची घोषणा केली आहे. भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर असलेला अधिकचा ताण तणाव कमी होईल. तसेच युवांना चांगले रोजगारही मिळेल.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.