औषधं पूरवठ्या अभावी महाराष्ट्रातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर तर मृतांच्या तांडव सुरूच : नांदेड नंतर घाटी रुग्णालयात २४ तासात एकूण १८ रुग्णांचा मृत्यू

पुणे दिनांक ३ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) नांदेड मध्ये आता एकूण मृत्यूचा आकडा ३१ झाला असून आता नांदेड नंतर आता छत्रपती संभाजी नगर मधून नवीन अपडेट हाती आली आहे.शासकीय रुग्णांल्याच्या कशा ' तीन तेरा नऊ बारा ' वाजल्याचे दिसून येत आहे.छत्रपती संभाजी नगर मधील शासकीय रुग्णालयात एकूण १८ रुग्णांनाचा मृत्यू झाला असल्याचीही माहिती कळत आहे.त्यामुळे एकंदरीत शासकीय रुग्णालयांचा कारभार राम भरोसे चालत असल्याचे या प्रकरणांवरुन दिसते आहे.नांदेड मध्ये आता प्रर्यंत एकूण ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर आता संभाजी नगर मध्ये एकूण १८ रुग्णांनाचा मृत्यू झाला आहे.या वरुन संपूर्ण महाराष्ट्रातीलच आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.नांदेड मधील रुग्णांलयाची घाटीतील संचालकांची टीम गेली आहे.संबधित खात्यांचे मंत्री हसन मुश्रीफ हे देखील नांदेडला रवाना झाले आहेत.
दरम्यान नांदेड व छत्रपती संभाजी नगर मधील शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या पालक व नातेवाईक यांनी गंभीर आरोप केले आहेत की रुग्णांनालयात औषधांचा तुटवडा भयानक प्रमाणावर आहे.रुग्णांना औषध मिळत नाही.असे सांगितले जात आहे.परंतू राज्य सरकार व वैद्यकीय प्रशासन मात्र औषध मुबलक प्रमाणात आहे.असे सांगतात तर बाहेरील जिल्ह्यातून अनेक रुग्ण येतात.तर काही रुग्ण प्रायव्हेट रुग्णातून बील भरण्या साठी पैसे नसल्यामुळे नंतर येथे येतात.पण असा दावा सरकार व प्रशासनाच्या वतीने करणे म्हणजे गरीब रुग्णांची एक प्रकारे केलेली ही ' चेस्टा ' आहे.गोर गरीब रुग्ण हे शासकिय रुग्णांलयातच उपचारासाठी साठी जाणार का ? मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात जाणार हे राज्य सरकारला व गल्लेलठ पगार घेणाऱ्या प्रशासन व वैद्यकीय अधिष्ठाता यांना समजायला हवे.परंतू काल प्रर्यत औषधं उपलब्ध नाही म्हणनारे नांदेडच्या वैद्यकीय अधिष्ठातांने अचानक पणे कुणाच्या दबावाखाली यूटन घेऊन आमच्या रुग्णांलायात पुरेसा साठा आहे.व रुग्णांचा मृत्यू हा अन्य आजारा मुळे झाला आहे.असे प्रसिद्ध पत्रक काढण्याची वेळ का आली.हे देखील स्पष्ट होणे गरजेचे आहे.
दरम्यान आता सरकार मधील मंत्री म्हणतात या प्रकरणी एक कमेटी नेमू आता यात निष्कर्ष काढणे योग्य नाही.मग ठाण्यातील घटनेबाबत समिती नेमली होती.याचा अहवाल कुठे गेला? या संपूर्ण प्रकरणात समजते की हापकीन या औषध कंपनीने औषक्ष पूरवठा बंद केला आहे.असे विरोधी पक्षांनी दावा केला आहे.प्रत्यक्षपणे या शासकीय रुग्णालयात औषध साठा असून देखील रुग्णांच्या गोरं गरीब नातेवाईक यांना बाहेरुन औषध आणण्यास सरळपणे सांगितले जाते.अनेक नागरिक शासकीय रुग्णालयातील डॉक्टर हे बाहेरून औषध आणण्यास सांगितले जाते.असे माध्यमाच्या प्रतिनिधींना सांगत आहेत.या सर्व गंभीर परिस्थितीवर वेळीच आरोग्य मंत्री. मुख्यमंत्री यांनी घेणे ही काळाची गरज आहे.अन्यथा यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते?
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.