' आरोग्यवती भव ' : ' आरोग्यवती भव ' आरोग्यासाठी चांगला उपक्रम पुणे शहर पोलिस आयुक्तालयात राबविण्यात आला आहे

पुणे दिनांक २५ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सध्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक कुटुंबाच्या घरात सर्वात भक्कम आणि खंबीर आधार एक स्त्री असते .व या अशा व्सस्त जिीवनशैलीत ती स्वतः कडे कधीच लक्ष देत नाही.' त्या साठी स्वतः विषयी जाणीव करून देण्यासाठी हा आगळा वेगळा उपक्रम पुणे शहर पोलिस आयुक्तालयात राबविण्यात आलेला आहे.
दरम्यान पुणे शहर पोलिस आयुक्तालयात श्री रितेश कुमार पोलिस आयुक्त पुणे शहर.मा.संदीप कर्णिक.पोलिस सहा आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली रुबीहाॅल हाॅस्पीटल यांच्या सहकार्याने शिवाजी नगर पोलीस वसाहत व स्वारगेट पोलिस वसाहत पोलिस कुटुंबातील महिलांसाठी दिनांक १० ऑगस्ट ते ११ ऑगस्ट रोजीचा कॅम्प यशस्वी रित्या पार पडला.या कॅम्प मध्ये जवळ पास ४०० पोलिस कुटुंबियांनी आपले वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या.त्यांना चाचणीचे रिपोर्ट वाटप करण्यात आले.त्याअनुषंगाने त्यांच्या वैद्यकीय तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार पुरविण्यात आले.
दरम्यान सदर कार्यक्रमास मा.पोलिस आयुक्त पुणे शहर यांच्या पत्नी श्रीमती अनुप्रिया कुमार.मा.सह आयुक्त पुणे शहर यांच्या पत्नी श्रीमती प्रिया कर्णिक.डाॅ.स्वाती पोकळे.डाॅ.सुरेखा चावरिया . श्रीमती रुपाली झेंडे.श्रीमती तेजश्री पवार.डाॅ.तेजश्री रानडे. रुबीहाॅल हाॅस्पीटलचे डाॅ प्रसाद मुगलीकर- डायरेक्टर मेडिकल सव्हिर्सेस. प्रभाकर श्रीवास्तव -जनरल मॅनेजर ह्युमन रिसोर्स.ऋषिकेश खांदवे- जनरल मॅनेजर मार्केटिंग.डाॅ.रश्मी भामरे स्रीत्रीरोगतज्ज्ञ . डॉ.देबाशिश देसाई -संसर्गजन्य रोग तज्ञ.तसेच त्यांची टीम व टेक्निशियन.शिवाजीनगर पोलिस हाॅस्पीटलचे डॉ.राऊत.डाॅ.देशपांडे.डाॅ.क्षिरसागर.व त्यांची टीम.स्वारगेट पोलिस हाॅस्पीटलचे डॉ जगदाळे व त्यांची टीम.होप फाॅर चिल्ड्रेन फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांच्या श्रीमती कॅराॅलीन व त्यांची टीम मुस्कान या स्वयंसेवी संस्थांच्या श्रीमती शुभदा रणदिवे व त्यांची टीम.व भरोसा सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे.संगिता जाधव.कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलिमा पवार.मार्केट यार्ड पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे स्वप्नाली शिंदे व अन्य पोलिस अधिकारी व ठाणे अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.