Hospital : ठाण्यातील शासकीय रुग्णालयांचा अनागोंदी कारभार १२ तासात १७ रुग्णांनाचा मृत्यू, नातेवाईकांन कडून चौकशी करण्यांची मागणी

पुणे दिनांक १३ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) ठाणे येथील कळवा मधील महानगरपालिकाचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रशानांचा अनागोंदी कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.या रुग्णालयात १२ तासांच्या आत एकूण एक व दोन नव्हे तर १७ रुग्णांनाचा मृत्यू झाल्यांने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.यामध्ये अतिदक्षता विभागातील १२ रुग्णांनाचा तर अन्य विभागातील ४ व अन्य एक अशा रुग्णांनाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे रुग्णालयात आता मोठ्या प्रमाणावर नातेवाईक व सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन चांगलाच गोंधळ घातला आहे.येथे पोलिसांनचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान एकच दिवसांपूर्वी या रुग्णालयात ५ रुग्णांनाचा मृत्यू झाला होता.त्यावेळी लोकप्रतिनिधी यांनी या रुग्णालयांचा वैद्यकीय अधिष्ठाता यांची कान उघडणी करून देखील त्यांनी वेळीच काही उपाययोजना न केल्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्दैवी व मोठी दुर्घटना घडली आहे.हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा होमपीच म्हणून ओळखला जातो.आणी ही दुर्दैवाची घटना देखील त्यांच्या जिल्ह्यातीलच आहे.मागील काही दिवसांपूर्वी याच जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कॅन्सरच्या रुग्णांल्याचे उद्घाटन केले होते. परंतु या बाबतीत जुन्या रुग्णांनालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.असे या प्रकरणांवरून दिसते.
या भागातील सिव्हिल रुग्णालया बंद आहे.त्यामुळे रुग्ण या रुग्णालयात येतात हे रुग्णालय ५०० बेडचे आहे.त्यामुळे येथील रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येतो.असे या रुग्णांल्याचे वैद्यकीय अधिष्ठाता यांचे म्हणणे आहे.पण याबाबत रुग्णांल्याच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे या बाबतीत अडचणी का सांगितल्या नाही.हा एक कळीचा मुद्दा आहे.दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांचे पोस्ट मार्टम करुन त्यांचे शव देण्यात देखील प्रचंड प्रमाणात उशिरा केला जातो आहे.असे रुग्णांच्या नातेवाइकांनचा आरोप यावेळी प्रशासनावर केला जात होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.