नांदेड शासकीय रुग्णालयात खासदारांकडून शिक्षा : नांदेड मधील शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाताकडून करुन घेतले स्वच्छतागृह साफ

पुणे दिनांक ३ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) नांदेड जिल्ह्यातील डाॅ.शकंरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णांलयात डाॅ.वैद्यकीय अधिष्ठाता वाकोडें यांना रुग्णांलयातील ३१ रुग्णांचे मृत्यू व रुग्णालयात असलेली अस्वच्छता बाबत त्यांना चक्क शिवसेना खासदार यांनी त्यांच्याकडून रुग्णांनालयातील स्वच्छतागृहच साफ करून घेतले आहे.
शिवसेना खासदार शिंदे गटाचे हेमंत पाटील यांनी आज या रुग्णांनालया ३४ रुग्णांचे मृत्यू प्रकरणी भेट दिली.व त्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली.त्यांनी रुग्णांल्याच्या वैद्यकीय अधिष्ठाता वाकोडें यांना खडेबोल सुनावले व त्यांनी चक्क यावेळी त्यांच्या कडून स्वच्छतागृह साफ करून घेतले.या रुग्णांलायांची स्वच्छतागृह अंत्यंत घाण झाले होते.या रुग्णांनालयाची स्वच्छता केली जात नाही.तसेच " शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा अधिकाऱ्यांनी अपव्यय केला आहे .येथील रुग्णांनच्या मृत्यूस वैद्यकीय अधिष्ठाता हेच जबाबदार आहे.व त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे" असे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.