पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल : सिरम इंडियाचे सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका,ऑंजिओप्लास्टी पूर्ण

पुणे दिनांक १७ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) उद्योगपती व सीरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांना ह्दृदयविकाराचा सौम्य असा झटका आल्याने त्यांना रुबीहाॅल हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.डाॅ.प्रर्वेझ ग्रॅंट यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर ऑंजिओप्लास्टी झाल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान आता सायरस पुनावाला यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.
दरम्यान याप्रकरणी रुबीहाॅल हाॅस्पीटलकडून याबाबतची एक मेडिकल बुलेटिन प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. दरम्यान आज शुक्रवारी १६ नोव्हेंबर रोजी ह्दृदयविकाराच सौम्य असा झटका आला.त्यांना तातडीने रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आले होते.पहाटे डॉ.प्रर्वेझ ग्रॅट यांच्या देखरेखीखाली ऑंजिओप्लास्टी करण्यात आली आहे.त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे.त्यांना रविवारप्रर्यत त्यांना रुग्णांनालयातून डिस्चार्ज मिळेल अस रुग्णांलया प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.