पहिला जीआर नंतरच माघार . जरांगे पाटील उपोषणावर ठाम.. : उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी लावलं सलाईन...

पुणे दिनांक ६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून याकरिता मनोज जरांगे पाटील यांची लढाई अजूनही सुरू आहे .त्यांचा उपोषणाचा आजचा ९ वाढ दिवस आहे.काल पासून त्यांनी जलत्याग केला आहे.त्यांच्या प्रकृतीच्या तपासणी करण्या करिता डॉक्टर यांचे एक पथक अंतरवाली सराटी गावात आहे.त्यांची प्रकृती खालावल्याने डाॅक्टारांनी त्यांना सलाईन लावले आहे.
दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ९ वा दिवस आहे.त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी सलाईन लावले आहे.पोटात अन्न पाणी नसल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या त्यांना जाणवत आहे.म्हणून त्यांची प्रकृती आणखीन खालावू नये म्हणून सलाईन लावण्यात आले आहे.दरम्यान अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीव सक्सेना व नव्याने आलेले जालना पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज अंतरवाली सराटी गावात आंदोलन स्थळी जाऊन उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.