आरोग्य : १५ ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्यात शासकीय रुग्णालयात रुग्णांना मिळणार मोफत उपचार मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय

पुणे दिनांक १३ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांनासाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात आता सर्वांना मोफत उपचार मिळणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयांचा फायदा गरीब व गरजू रुग्णांना मिळणार आहे.ही योजना १५ ऑगस्ट पासून राज्यात लागू होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.
दरम्यान याप्रकरणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे.या बैठकीत आरोग्य खात्याशी संबंधित हा निर्णय घेण्यात आला आहे.भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल २१च्या अंतर्गत असलेल्या चांगल्या आरोग्यासह जगण्याचा अधिकार नागरिकांना आहे . सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या लाभार्थींन मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.या रुग्णांना क्वचित प्रसंगी उपचारासाठी तसेच तपासणी साठी शासन निर्णयानुसार मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.यातसर्व मोफत शस्त्रक्रिया व इसीजी.एक्स-रे सिटी-सॅक्न या सर्व चाचण्या मोफत होणार आहे.१५ऑगस्ट पासून मिळणीर आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.