Tukaram mundhe : आरोग्य विभागाची सूत्र घेताच तुकाराम मुंढे ऍक्टिव्ह मोडमध्ये. मुंढे जोमात तर भ्रष्ट अधिकारी कोमात?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली मध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे आरोग्य विभाग सेवा आयुक्त पद व राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदी नव्याने नियुक्ती केली आहे. त्यांनी ३०. सप्टेंबर रोजी सूत्रे हाती घेतली असून मुंढे हे जोमात आहे तर 'भ्रष्टाचारी मात्र आता कोमात ' गेले आहेत.
दरम्यान आयुक्त आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा पदभार स्वीकारताच मुंढे हे आता चांगलेच ऍक्टिव्ह मोडमध्ये आले असून त्यांनी आत्ता पदभार घेताच यापूर्वी मरगळलेली व सुस्त तसेच भ्रष्टाचारी आरोग्य यंत्रणा. आता नव्याने कात टाकणार आहे. यामध्ये मात्र आता तीळ मात्र शंका नाही. आता प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य अधिकारी व आरोग्य उपसंचालक जिल्हा आरोग्य अधिकारी यापूर्वी फार सुस्तावलेल्या होते. पण आता त्यांची मात्र धावपळ चालू झाले चे चित्र पाहण्यास मिळत आहे.
आता हे सर्वजण जिल्ह्यात तसेच तालुका व जिल्हास्तरीय पातळीवर असलेल्या सर्व शासकीय रुग्णालयात आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे कर्मचारी वेळेवर कामाला येतात का तसेच डॉक्टर ही संपूर्ण वेळ हेडकॉटर ला असतात का रुग्णालयात येणाऱ्या सर्व नागरिकांवर व्यवस्थित उपचार होतात का असे सर्व बारीक सारीक गोष्टीवर लक्ष देण्यासाठी सुस्तवलेल्या अधिकाऱ्यांची मात्र एकच धांदल उडाली असून. त्यांना रोज या सर्व गोष्टीवर डोळ्यात तेल घालून काम करायला लागत आहे. एखांदा डॉक्टर किंवा कर्मचारी कामावर गैरहजर असेल तर त्याला लगेच सस्पेंड करण्याच्या सूचनाच मुंढे यांनी दिले आहेत साहेबांचा दरारा पाहून अधिकारी यांनी आता आपण केलेल्या व्हिजिटचा फोटो काढत आहे. तसेच गुगल लोकेशन टाकून काम करीत आहे. अधिकाऱ्यांची आता तालुका पातळी व जिल्हा पातळीच्या विजीटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यापूर्वी चालणाऱ्या तोडी आणि माडी आता संपूर्णपणे बंद झाले आहेत. आपल्यावर कधीही निलंबनाची कारवाई होऊ शकते. असा धस्काच आता राज्यातील सर्व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे . एकंदरीत तुकाराम मुंढे ऍक्टिव मोड मध्ये आल्याने सर्व आरोग्य विभागाचे चित्र बदललेले पाहण्यास मिळत आहे. " एकंदरीत तुकाराम मुंढे जोमात अधिकारी कोमात " म्हणले तर वावगे ठरणार नाही. व काही का असेना. मात्र गरीब लोकांचे आता आरोग्य नक्कीच सुधारेल यात आता तीळ मात्र शंका नाही. असा नाॅट करप्षन अधिकारी तसेच कर्तव्यनिष्ठ अधिकारी महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याला मिळाल्याने महाराष्ट्रातील नागरिकांचे आरोग्य मात्र चांगलेच उंच होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.