Grand mosque collapsed : इंडोनेशियामध्ये नूतनीकरणाच्या कामादरम्यान भव्य मशीद कोसळली

इंडोनेशियामध्ये नूतनीकरणाच्या कामात भव्य मशीद कोसळली. इंडोनेशियातील जकार्ता येथील इस्लामिक सेंटर ग्रँड मशिदीचा भव्य घुमट नूतनीकरणाच्या कामात आग लागल्याने कोसळला आहे.
इंडोनेशियातील जकार्ता इस्लामिक सेंटर ग्रँड मशिदीचा महाकाय घुमट काल भीषण आगीत कोसळला. आगीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मशिदीचा घुमट कोसळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नूतनीकरणादरम्यान लागलेल्या आगीत मशिदीचा घुमट नष्ट झाला. काल दुपारी तीनच्या सुमारास आग लागली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली. व्हिडीओ फुटेजमध्ये मशिदीच्या घुमटातून ज्वाला आणि धूर निघत असल्याचे दिसून आले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
वृत्तानुसार, त्यावेळी इस्लामिक सेंटरचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. आगीत किंवा पुढील ढिगाऱ्यामुळे कोणीही जखमी झाले नाही आणि पोलीस आगीच्या कारणाचा तपास करत आहेत आणि इमारतीवर काम करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी करत आहेत. मशिदीव्यतिरिक्त, इस्लामिक सेंटर कॅम्पसमध्ये शैक्षणिक, व्यावसायिक आणि संशोधन सुविधा देखील आहेत.
20 वर्षांपूर्वी नूतनीकरणादरम्यान याच मशिदीच्या घुमटाला आग लागली होती हे विशेष. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी 5 तास शर्थीचे प्रयत्न केले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.