भारत सरकारच्या वतीने ' ऑपरेशन अजय ' अंतर्गत : इस्त्रायल मध्ये अडकलेल्या २१२ भारतीय नागरिकांना 'इअरलिफ्ट', पहिलं विमान दिल्लीत आज सकाळी दाखल

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) इस्त्रायल मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्या साठी भारत सरकारच्या वतीने ' ऑपरेशन अजय ' सुरू केलंय. इस्त्रायल येथील तेल अवीव विमानतळावरून २१२ भारतीयांना घेऊन पहिले चार्टर विमान आज सकाळी भारतात पोहोचलं.यावेळी दिल्ली विमानतळावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी इस्त्रायल वरुन आलेल्या भारतीय नागरिकांचे स्वागत केले आहे.यावेळी ते म्हणाले की आता आमचं भारतीय नागरिकांना परत आणण्याचं प्राधान्य आहे.त्यानुसार फ्लाइटचं वेळापत्रक केलं जाईल.सध्या या करिता चार्टर विमानं वापरली जात असली तरी सर्व प्रर्याय खुले आहेत.गरज पडल्यास भारतीय हवाई दलाची मदत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.यापूर्वी अशा परिस्थितीत सैन्य दलाची मदत घेण्यात आली आहे.
दरम्यान इस्त्रायल मध्ये एकूण १८ हजार भारतीय नागरिक अडकले आहेत अडकलयांनी भारतीय दूतावासात स्वतःची नोंदणी करावी व सल्ल्याचं पालन करावे.असं त्यांना आवाहन करण्यात आले आहे वेस्ट बँक व गाझा या पॅलेस्टिनी प्रदेशात भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत बद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले काही डझन लोक वेस्ट बँक मध्ये आहेत.तर ३ ते ४ लोक गाझा मध्ये आहेत.आता आम्हाला इस्त्रायलाकडून फक्त लोकांना बाहेर काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तेथून एकही भारतीयाचा मृत्यू झाल्याची माहिती आलेली नाही.काहीजण जखमी झाले असून ते रुग्णालयात आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.