S Jaishankar : परराष्ट्र मंत्री जयशंकर मालदीव भेटीवर

माले : भारताचे शेजारी देश श्रीलंका आणि मालदीव या तीन दिवसीय दौऱ्याचा एक भाग म्हणून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बुधवारी मालदीवमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचे विदेशातील समपदस्थ अब्दुल्ला शाहिद यांनी स्वागत केले.
ट्विटरवर एस जयशंकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, “मालदीवमध्ये स्वागत आहे, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि माझे प्रिय मित्र.” भारत-मालदीव भागीदारीद्वारे प्रदान करण्यात आलेल्या विकासात्मक मदतीचा प्रभाव पाहण्यासाठी ते येथे आले आहेत.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे मालदीव आणि श्रीलंकेसोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी वाढवण्यासाठी दोन्ही देशांच्या भेटींवर जात आहेत. मालदीवमध्ये ते द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षरी करतील. यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची भेट घेतील आणि परराष्ट्र मंत्री शाहिद यांच्याशी चर्चा करतील.
मालदीव आणि श्रीलंका हे दोन्ही देश हिंदी महासागर क्षेत्रातील भारताचे प्रमुख सागरी शेजारी आहेत आणि पंतप्रधानांच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ या संकल्पनेत त्यांचे विशेष स्थान आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.