Blast in Jammu : जम्मूच्या नरवाल भागात सलग २ बॉम्बस्फोट, ६ जण जखमी

जम्मूच्या नरवाल भागात आज म्हणजेच शनिवारी सकाळी दोन स्फोट झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. एडीजीपी जम्मू (एडीजीपी) मुकेश सिंह यांनी सांगितले की, जम्मूच्या नरवाल भागात झालेल्या दुहेरी स्फोटात सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले
सर्व जखमींना जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून पुढील तपास सुरू आहे." जखमींमध्ये 35 वर्षीय सोहेल कुमार, 26 वर्षीय सुशील कुमार, 25 वर्षीय विशाप प्रताप, 52 वर्षीय विनोद कुमार, 25 वर्षीय अरुण कुमार, 40 वर्षीय अमित कुमार, 35 वर्षीय राजेश कुमार यांचा समावेश आहे आणि प्रजासत्ताक दिन आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू विभागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
नरवाल भागातील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये स्फोट झाला
नरवाल भागातील ट्रान्सपोर्ट नगरच्या सात आणि नऊ क्रमांकाच्या यार्डमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी उभी असलेली सर्व वाहने हटवत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.