Maharashtra Doctors on Strike : महाराष्ट्रातील सर्व रेजिडेंट डॉक्टर संपावर, इमर्जन्सी सेवा देणार नाहीत, जाणून घ्या काय आहे त्यांची मागणी?

महाराष्ट्राचे रेसिडेंट डॉक्टर आजपासून संपावर आहेत. संपाचे कारण असे आहे की त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. त्यामुळे आजपासून सर्व डॉक्टर एमर्जन्सि सर्विस सेवा बंद करणार आहेत. मुळात त्यांची नाराजगी त्यांच्या बऱ्याच मागण्या पूर्ण न करण्यामुळे आहे, त्याचबरोबर या संपामध्ये सीनियर डॉक्टर सोबतच जूनियर डॉक्टर यांचा समावेश आहे
अन्य रीपोर्टनुसार रेसिडेंट डॉक्टर संपाबद्दल सांगितले आहे की त्यांच्या अनेक मागण्यांमध्ये सीनियर रेसिडेंटसाठी नवीन पदांची निर्मिती करावी , 7 व्या वेतन आयोगानुसार डीए, सरकारकडून कोविड सेवा देय न भरणे यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, ज्यामध्ये जूनियर आणि सीनियर रेसिडेंट डॉक्टर या संपात सहभागी आहे.
आजपासून फक्त आणि फक्त इमर्जन्सी सेवा देऊ. बाकीच्या इमर्जन्सी नसलेल्या सेवा बंद करनार आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर ते संगत आहेत की, ज्या जूनियर डॉक्टरांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे ते वरिष्ठ पदांच्या पदोन्नतीच्या शोधात आहेत. तर दुसरीकडे पीजी पदवी घेऊन सरकारी रुग्णालयात एक वर्षाची प्रॅक्टिस पूर्ण केलेले सीनियर डॉक्टरही संपावर आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.