ED Raids : मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आज देशभरात 40 ठिकाणी मोठी छापेमारी

दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्यानंतर ईडीने आज देशभरात मोठी छापे मारीची मोहीम चालू केली असून दिल्ली तेलंगणा पंजाब, नेल्लोर, चेन्नई, हैदराबाद सह अन्य एकूण ४० ठिकाणी छापेमारी केली असून फक्त हैदराबाद शहरात एकूण २० ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
ई डी ने मद्य धोरणा विषयी मोठी मोहीमच हाती घेतली असून एकूण ४०. ठिकाणी ही मोहीम नुसार कारवाई करण्यात आली आहे.या पूर्वी देखील मद्य धोरणा संदर्भात अनेक राज्यात छापेमारी केली होती.भाजपाने दिल्ली मधील आम आदमी पक्षाच्या सरकार वर नवीन मद्य धोरणा बाबत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.दिल्ली च्या नवीन उत्पादन शुल्क विभाग धोरणातील कथीत अनियमतेशी संबंधित मनी लॉन्ड्रीग प्रकरणाच्या चौकशी संदर्भात मनीष सिसोदिया यांनी आरोप फेटाळले आहेत.ई डी ने एकूण ४० ठिकाणी छापे मारी केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने दारु माफियांची रुपयांची कर्ज माफ केली. त्यामुळे दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे. मोठ्या प्रमाणात आबकरी महसूल बुडल्याचा आरोप भाजपा ने आम आदमी पक्षावर केला आहे. त्यामुळे आता नवीन मद्य धोरणाचे जे लाभार्थी आहेत. त्यांना नवीन मद्य धोरणाचा फायदा झाला आहे. अशा व्यापाऱ्यांच्या ठाव ठिकाणांवर ई डी ने आता लक्ष केंद्रित करून छापे मारी सुरू केली आहे.दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या वर मद्य व्याप्यारी यांना ३० कोटी रुपयांची सुट दिल्याचा आरोप आहे .तसेच परवानाधारकांना त्यांच्या इच्छेनुसार मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे.तसेच उत्पादन शुल्क विभागाचे नियमांचे उल्लंघन करून मद्य नियम बदलले आहेत असा आरोप आहे.पण भाजपचे हे सर्व आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी फेटाळले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.