Maharashtra Resident doctors strike back : महाराष्ट्रातील रेसिडेंट डॉक्टरांचा संप मागे : वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

जसे की काल रेसिडेंट डॉक्टर यांनी संपाद्वारे त्यांच्या मागण्या मागीतल्या होत्या . त्यामध्ये त्यांनी सीनियर रेसिडेंटसाठी नवीन पदांची निर्मिती करावी , ७ व्या वेतन आयोगानुसार डीए, सरकारकडून कोविड सेवा देय न भरणे यांची मागणी केली होती . त्याचबरोबर ते सांगत आहेत की, ज्या जूनियर डॉक्टरांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे ते वरिष्ठ पदांच्या पदोन्नतीच्या शोधात आहेत असे त्यांचे म्हणणे होते, त्यावर आज मागील २ दिवसांपासून चालू असलेला संप राज्यभरातील रेसिडेंट डॉक्टर संप मागे घेतला आहे. संप मागे घेतला याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी मागण्या पूर्ततेसाठी दोन दिवसाचा अवधि मागून या दोन दिवसात मुख्यमंत्री आणि संबंधित पालिका अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
वरील आश्वासन दिल्यानंतर रेसिडेंट डॉक्टरांनी हा संप मागे घेतला आहे. डॉक्टरांसोबत आज आमची सकारात्मक चर्चा झाली आहे.त्यामध्ये त्यांनी त्यांच्या काही मागण्या मागीतल्या आहेत.
त्याचबरोबर यांच्या खालील काही मागण्या केल्या आहेत :
१. निवासी डॉक्टरांची १४३५ पदे निर्माण करावीत.
२. कोविड काळातील भत्ता तातडीने देणे.
३. हॉस्टेल वाढवणे, असलेल्या ठिकाणी दुरुस्ती करणे.
४. सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता देणे.
५. यानुसार २०१८ पासूनची थकबाकी द्यावी.
६. नायर हॉस्टेल कोविड अलाऊन्स तातडीने द्यावा.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी रेसिडेंट डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत आणि तसेच वासतिगृहसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे त्यांनी सांगितले आहे. आंदोलन करण्यापूर्वी माझी भेट झाली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता असेही गिरीश महाजन यांनी सांगितले
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.