Sonia Gandhi health update : सोनिया गांधीं हेल्थ अपडेट: प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी व्हायरल संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती परंतु आता त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. गंगाराम रुग्णालयात डॉक्टरांचे एक टीम सोनियांवर देखरेख करत आहे. प्रियांका गांधी आई सोनियासोबत रुग्णालयात उपस्थित आहेत. आजही हॉस्पिटल सोनियांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटिन जारी करू शकते.
रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे प्रमुख डॉ. अजय स्वरूप यांनी एक निवेदन जारी केले की, "सोनिया गांधी यांना आज आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डॉ. अरुप बसू आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली 'चेस्ट मेडिसिन' विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांच्यावर व्हायरल रेस्पीरेटरी इन्फेक्शनमुळे उपचार सुरू आहेत.
अन्य वृत्तपत्राच्या रीपोर्ट नुसार सोनिया गांधी मंगळवारपासून आजारी आहेत, म्हणूनच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा मंगळवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशात दाखल झालेल्या भारत जोडो यात्रेत सात किलोमीटर चालत दिल्लीला परतले होते.
उत्तर प्रदेशातील बागपत येथील माविकलान येथे रात्री थांबल्यानंतर बुधवारी सकाळी ६ वाजता काँग्रेसची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू झाली.
प्रियांका गांधी मात्र यात्रेच्या पुन्हा सुरू झालेल्या राहुल गांधींसोबत सहभागी झाल्या नाहीत. ती दुपारनंतर सामील होण्याची शक्यता आहे, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.