Sonia Gandhi health update : सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर गंगाराम यांना दाखल करण्यात आले होते.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोनिया गांधी यांना मंगळवारी दुपारी ३ वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सर गंगाराम हॉस्पिटलच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.अजय स्वरूप यांनी याला दुजोरा दिला आहे.
श्वसनाच्या त्रासामुळे दाखल करण्यात आले होते
सोनिया गांधी यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना बुधवारी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले होते की, सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना चेस्ट मेडिसिन विभागात दाखल करण्यात आले असून, डॉ. अरुप बसू यांच्या टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी सोनिया गांधी यांना कोरोना संसर्गानंतर झालेल्या त्रासामुळे 12 जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 जून रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.