शरद पवार कडून वकिलांचा कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर द्या आमदारांना शरद पवार यांचा आदेश : शरद पवार यांच्या गटातील ८ आमदारांना ८ दिवसांत आपलं उत्तर सादर करा विधीमंडळांची नोटीस

पुणे दिनांक २८ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मोठा पेच निर्माण झाला आणि शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले पण आता हा पेचात सर्वोच्च न्यायालयात देखील लढा सुरू आहे.आता याच सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या एकूण ८ आमदारांना विधीमंडळांच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे.व आपले म्हणणे ८ दिवसांत मांडण्यांचे आदेश या नोटीस मध्ये म्हटले आहे.दरम्यान या नोटीस नंतर शरद पवार यांनी आमदारांना वकिलांचा सल्ला घेऊन उत्तर द्यावे असं आपल्या आमदारांना सांगितले आहे.
दरम्यान विधीमंडळाच्या वतीने शरद पवार गटाचे आमदार असे आहेत १) अनिल देशमुख.२) राजेश टोपे.३) सुनिल भुसार.४) प्राजक्ता तनपुरे ५) रोहित पवार ६) सुमन पाटील ७) बाळासाहेब पाटील ८) संदीप क्षीरसागर या प्रमाणे आहेत.या सर्वांना ८ दिवसांत आपलं म्हणणं सादर करा असे सांगण्यात आले आहे.दरम्यान या नोटीस नंतर शरद पवार यांनी वकिलांचा सल्ला घेऊन नोटीसला उत्तर द्यावे असे यातील आमदारांना सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.