State minister into central government : राज्यातील मंत्री केंद्रात ? मोदी सरकारचा मोठा डाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला मंत्री करणार, याची खबरबात कोणालाच नाही. परंतु २०२४च्या निवडणुका लक्षात घेऊन काही वरिष्ठ मंत्र्यांना सरकारमधून पक्षात पाठवले जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
अनेक दिवसांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे विद्यामान मंत्र्यामध्ये अस्वस्था निर्माण झालीय. या विस्तारात चांगली कामगिरी नसणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच भारतीय जनता पक्षात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. सोबतच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील काही चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारमध्ये अंतिम फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटकासह नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यादृष्टीने भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत झालेल्या विचार मंथनानंतर मंत्रिमंडळात बदल होणार आहे.
मंत्रिमंडळात बदल करताना महाराष्ट्र भाजपमधील एका बड्या नेत्याचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा सुरु झालीय. हा नेत्या विद्यामान शिंदे सरकारमध्ये मंत्री आहे. त्या नेत्यास आता केंद्रात जबाबदारी दिली जाणार आहे.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मदत करणाऱ्या शिंदे गटाच्या काही चेहऱ्यांना केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार याकडेही राज्यातील जनतेसह राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीत प्रत्येक राज्यानुसार अहवाल घेण्यात येणार आहे. आपल्या राज्यात पक्ष संघटना वाढवण्यासाठी काय केले? त्याचा अहवाल बैठकीत मांडावा लागणार आहे. बैठकीचे समापन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने होणार आहे. या भाषणातून पंतप्रधान व भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा पक्षाची भूमिका मांडणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.