Politiks : मोठ्या साहेब का छोटे साहेब कोणाचा झेंडा खांद्यावर घ्यायचा पुण्यात आज निर्णय होणार

पुणे दिनांक ४.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) महाराष्ट राज्यात मोठा राजकीय भुकंप रविवारी झाला असून धाकल्या साहेब यांनी आपला स्वतंत्र गट करून करून सरकार मध्ये डेरे दाखल झाले आहेत. तर मोठ्या साहेबांनी आपला स्वतंत्र गट करून महाराष्टभर फिरून आपले वेगळे अस्तित्व दाखवून देणार असे सांगितले व बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देणार असे सांगितले. पण कार्यकर्ते आता मोठ्या साहेबांचा का धाकल्यासाहेबांचा झेंडा खांद्यावर घ्यायचा या संभ्रारात असून ते आज पुण्यात बैठक घेणार आहेत व आपली भुमिका ठरवणार आहेत.
धाकल्या साहेंबा बरोबर ९.जणांनी जाऊन शिंदे व फडणवीस सरकार मध्ये डेरे दाखल होऊन मंत्री पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस च्या या फुटी च्या पाश्र्वभूमीवर शरद पवार हे मैदानावर उतरले असून त्यांनी गुरू पोर्णिमा निर्मित कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे. दर्शन घेऊन तेथूनच रणशिंग फुंकले आहेत. त्यामुळे आता दोन्ही गटातून ऐक एकमेकांच्या नेत्यांची हकालपट्टी करण्याचे काम चालू आहे. आता या सर्व घडामोडी नंतर कार्यकर्ते मात्र संभ्रारात आहेत. त्यामुळे आपण मोठ्या का धाकल्या साहेबांचा झेंडा खांद्यावर घ्यायचा या बाबत आज पुण्यात बैठक घेणार असून त्यात आपला निर्णय घेणार आहेत.
या बाबत शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक पुण्यातील घोले रोड येथील नेहरू सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर कार्यकारीणी ची बैठक होणार आहे. सदरच्या बैठकी मध्ये.आजी माजी आमदार व खासदार महापौर नगरसेवक व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना या बैठकी साठी निमंत्रित करण्यात आले आहे. यात तालूका अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांचा पण सहभाग आसणार आहे. सदरची बैठक ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी बोलवली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.