मराठा समाजाच्या वतीने दिला होता काळे फासन्यांचा इशारा : कार्तिकी एकादशीला दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण देणार नाही, मंदिर समितीचा मोठा निर्णय

पुणे दिनांक ८ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीला पूजाकरीता या वेळी कुणाला बोलवायचे असा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता.यावेळी उपमुख्यमंत्री दोन व त्यात भरीस भर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्द्यांवरुन मराठा समाज देखील आक्रमक या सर्व पार्श्वभूमीवर आज पंढरपूरात मंदिर समितीची बैठक झाली व यात निर्णय घेण्यात आला की यावर्षी कोणत्याही उपमुख्यमंत्री यांना कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी बोलवायचे नाही.ना, अजित पवार व , ना , देवेंद्र फडणवीस असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे .व यात मराठा समाजाच्या भावना शासनाला कळविण्यात येणार आहे.अशी माहिती विठ्ठल रखुमाई मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान आज पंढरपूरात याबाबत बैठक बोलावली होती.व सदर बैठकीत महाराष्ट्रांचे राजकारण दोन उपमुख्यमंत्री व यातील कोणत्या उपमुख्यमंत्री यांना शासकीय पुजेला बोलवायचे तसेच मराठा समाजाचा आरक्षणांचा मुद्दा व आंदोलनकर्ते यांनी कार्तिकी एकादशीला शासकीय पूजा साठी येणाऱ्या उपमुख्यमंत्री यांना काळे फासून असा इशारा देण्यात आला होता.या सर्व पार्श्वभूमीवर मराठा समाजाचा रोष पाहता मंदिर समितीच्या वतीने मराठा समाजाच्या भावना राज्य सरकारला कळविण्यात येणार आहे.व कोणत्यांच उपमुख्यमंत्री यांना यावेळी शासकीय पूजा करीता मान न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मागील वर्षी कार्तिकी एकादशीची पूजा ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.दरम्यान आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाजाच्या वतीने कोणत्याही उपमुख्यमंत्री यांना विठ्ठल रखुमाई यांची शासकीय पूजा करू देणार नाही.व त्यांना काळे फासले जाईल असा इशारा देण्यात आला होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.