व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री पवार व फडणवीस यांच्यात झालेल्या संवादांचा व्हिडिओ झाला व्हायरल

पुणे दिनांक १३ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणा साठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. यासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या संवादांचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे." हे आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं असे म्हणताना दिसत आहे.त्या वर पवार ' हा' असे म्हणतात.पण फडणवीस यांचा माईक चालू असल्याचे कळताच त्यांनी माईक चालू असल्याचे दोघांच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.मराठा आरक्षण संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेआधी झालेल्या व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या व्हिडिओ वरून अनेकांनी मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला आहे.याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वता माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिले आहे की.हा व्हिडिओ इडीटींग करून व कटछाट करून बनविलेला आहे.तसेच याला कोणीही बळी पडू नका.काही खोडसाळ लोकांनी हा व्हिडिओ बनवून सर्वत्र व्हायरल केला आहे.सरकार मराठा आरक्षणासंदर्भात गांभीर्याने विचार करत असल्याचे ते म्हणाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.