Aditya Thackeray took a dig at chief minister : आदित्य ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांची पोल खोल मुंबई महापालिकेच्या पैसा दुसऱ्या संस्थेच्या घशात.

मुंबई : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी या टेंडरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा शिंदे सरकारने केल्याचा आरोप केला आहे. कंत्राटदारांना तब्बल 48 टक्के फायदा देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना किती एजन्सी कुठे आणि किती काम करतात याबद्दल माहिती नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरणाची घोषणा केली होती.
यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मूळ 5 हजार कोटींचे टेंडर वाढवून 6 हजार 80 कोटी रुपयांचे केले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनातही अनेक घोटाळे काढले. पण, त्यावर कारवाई सोडा हे खोके सरकार आणखीनच घोटाळे करत आहेत. मुंबईकरांसमोर सत्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Maharashtra News, Aditya Thackeray took a dig at chief minister News, Maharashtra Politics News, latest Maharashtra marathi news and Headlines based from Maharashtra City. Latest news belongs to Maharashtra crime news, Maharashtra politics news, Maharashtra business news, Maharashtra live news and more at Polkholnama.