Politiks : केंद्र सरकारने निलंबन रद्द न केल्यास सुप्रीम कोर्टात जाणार, अधीररंजन चौधरी

पुणे दिनांक १३ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) नुकतंच संसद सभागृहातून निलंबित करण्यात आल्या नंतर काॅग्रेस नेते अधीररंजन चौधरी आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत. लोकसभेतील निलंबन रद्द केले नाही तर आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ . अशी माहिती त्यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.संसदेतील पावसाळी अधिवेशनादरम्यान अधीररंजन चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान शनिवारी १२ ऑगस्ट रोजी एका पत्रकार परिषदेत बोलताना चौधरी म्हणाले की एक नवीन घटना आहे.संसदेच्या आपल्या करिअरमध्ये याआधी असा अनुभव कधीच आला नाही.निलंबन करणे हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे.सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक असे करण्यात येत आहे.असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.हे संसदीय लोकशाही भावना कमजोर करेल.त्यांच्या निलंबनविरुध्द प्रस्तावाला अधिवेशनादरम्यान आवाजी मतदानाने पारित केले.चौधरी यांच्या निलंबनाच्या नंतर शुक्रवारी लोकसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधीपक्ष ' इंडिया ' च्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेत संसदेतून सभात्याग केला.या निलंबनाच्या विरोधात सर्व खासदारांनी संसद ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यत मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.