आदित्य ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोल : आदित्यने त्यांना ' सळो की पळो ' करुन सोडले आहे.

पुणे दिनांक १ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे १६ नोव्हेंबरला हिंदुस्थानात येणार आहेत.मात्र याचे राजकरण करण्यात येवू नये.या वाघनखांबाबत जनतेला योग्य ती माहिती मिळावी यासाठी आपण सरकारला ३ ते ४ प्रश्न विचारले होते.मात्र त्या प्रश्नांची उत्तरे देण्या पासून ते विषय टाळत आहेत.तसेच खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. हिच भाजपची भाषा आहे काय, हाच यांचा चेहरा आहे काय, त्यांनी त्यांच्या भाषेतून जनतेसमोर त्यांचा खरा चेहरा उघड केला आहे.माझ्या प्रश्नांमध्ये त्यांची बोलती बंद होते.एका आदित्यने त्यांना सळो की पळो करून सोडले आहे.अशा शब्दांत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान वाघनखे फक्त तीनवर्षीसाठी हिंदुस्थानात येणार आहेत. त्यानंतर ती लंडनला परत नेण्यात येतील.ही वाघनखे कायमस्वरूपी हिंन्दुस्थानात असावी.अशी जनतेची भावना आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत.त्यामुळे या मुद्द्यांवर भावनांशी खेळ करु नये.व्हिटोरिया अल्बर्ट वेबसाईटवर यांची माहिती आहे.. जोम्स ग्रॅंट डफ या इतिहासकाराच्या संग्रहातील ही वाघनखे आहेत.व छत्रपती शिवाजी महाराज यांचीच ही वाघनखे असल्यांचा त्यांचा दावा आहे.मात्र यांची पुष्टी करता येत नसल्याचे वेबसाईटवर म्हटले आहे.त्यामुळे यावर स्पष्टीकरणाची गरज आहे.भावनांशी कुठेही खेळ नको.असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.