Congress : काँग्रेसला 24 वर्षांनी बिगर गांधी अध्यक्ष, सोनिया पोहोचल्या खरगे यांच्या निवासस्थानी

काँग्रेसला मल्लिकार्जुन खरगे हे नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळाले आहेत. खारणे यांनी 7897 मते मिळवून पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी निवडणूक जिंकली. तर त्यांच्या समोर आलेल्या शशी थरूर यांना 1072 मते मिळाली.
काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवर्तमान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचे त्यांच्या निवासस्थानी अभिनंदन केले. पत्नी राधाबाई खर्गे यांचीही भेट घेतली.
काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, एकूण 9,385 मतांची मोजणी झाली. यामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना 7,897 आणि डॉ. शशी थरूर यांना 1,072 मते मिळाली. याशिवाय 416 मते रद्द करण्यात आली.
काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मल्लिकार्जुन खर्गे यांना शशी थरूर यांच्यापेक्षा 8 पट मते मिळाली आहेत.
बुधवारी सकाळी १० वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या मतमोजणीला सुरुवात झाली. यासोबतच 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील एका नेत्याची देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
देशभरात उभारलेल्या ६८ मतदान केंद्रांतील सर्व सीलबंद बावेट बॉक्स मंगळवारी सायंकाळपर्यंत दिल्लीत आणून पक्ष कार्यालयातील ‘स्ट्राँग रूम’मध्ये ठेवण्यात आले.
मल्लिकार्जुन खरगे यांचे मोजणी एजंट प्रमोद तिवारी, कोडिकुनिल सुरेश, गौरव गोगोई, सय्यद नासिर हुसेन, कुलजीत सिंग बगरा आणि गुरदीप सिंग सप्पल होते. तर कार्ती चिदंबरम, अतुल चतुर्वेदी आणि सुमेध गायकवाड हे थरूर यांचे मोजणी एजंट होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.