दौंड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक : माळेगावानंतर दौंड तालुक्यातील दौंड शुगर साखर कारखाना गळीत हंगाम मोळी पुंजनाच्या कार्यक्रमाला अजित पवार यांना मराठा आंदोलकांचा विरोध

पुणे दिनांक ३०ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले असून काल दौंड शहरात आलेले उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना देखील मराठा आंदोलंकानी अडवून पाच मिनिटांत दौंड शहर सोडून जाण्यास सांगितले.व सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली असताना तुम्ही कशाला आले मुळे मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता.आता पुणे जिल्ह्यातील नेते व पालक मंत्री अजित पवार यांना दौंड तालुक्यातील दौंड शुगर येथील साखर कारखाना गळीत हंगामाच्या मोळी पुंजनाच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे.
दरम्यान मराठा समाज हा आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आता रस्त्यावर उतरला आहे. आता हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपले आहे.आता या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.याच सर्व पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील आलेगाव येथे दौंड शुगर साखर कारखाना असून या साखर कारखाना येथे गळीत हंगामाच्या पुंजनाच्या कार्यक्रमाला अजित पवार हे दरवर्षी उपस्थित असतात. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.त्यामुळे या मोळी पुजनाच्या कार्यक्रमाला अजित पवार यांनी येऊ नये म्हणून मराठा समाजाच्या वतीने अशी भूमिका घेतली आहे .आता अजित पवार हे माळेगावच्या प्रमाणे गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला न जाता दौंड येथे देखील गळीत हंगामाच्या मोळी पुंजनाच्या कार्यक्रमाला स्थानिक शेतकऱ्यांना संधी देतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.