मराठा आरक्षणावर मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते भाष्य : आमदार सोळंके यांच्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक व मुंबईतील बंगल्यांची वाढविली सुरक्षा

पुणे दिनांक ३०ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यांचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर आज सकाळी मराठा समाजाच्या आंदोलंकानी त्यांच्या बंगल्यावर आधी तुफान दगडफेक केली व नंतर त्यांच्या पार्किंग मधील वाहने पेटवून दिल्यानंतर आता अनेक नेत्यांच्या व मंत्र्यांच्या बंगल्यावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येत आहे.आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज हा प्रचंड प्रमाणावर आक्रमक झाला असून आरपारच्या भुमिकेवर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरला आहे.व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजा बाबत भाष्य केल्यामुळे जरांगे पाटील व छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे.यासर्व पार्श्र्वभूमीवर सरकारने भुजबळ यांच्या मुंबई व नाशिक येथील बंगल्यावर कडेकोट पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज हा आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाला आहे.अनेक ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांना आता मराठा आरक्षणाचा मुद्द्यांवरुन घेराव घालण्यास सुरुवात केली आहे.तर कुठे त्यांच्या वाहनांची तोडफोड सुरू केली आहे.आज बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर प्रचंड प्रमाणावर तुफान दगडफेक करण्यात आली आहे.व त्यांच्या पार्किंग मध्ये असलेल्या गाड्यांना 🔥 लावण्यात आली आहे.दरम्यान ही सर्व परिस्थिती पाहता मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक व मुंबईतील बंगल्यावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.