मराठा आंदोलना नंतर मराठा समाजाचे आमदार झाले आक्रमक : शिवसेनेच्या खासदार नंतर भाजपच्या आमदाराचा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिला राजीनामा

पुणे दिनांक ३०ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पून्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. व आता ह्या आरक्षणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणा वर हे वादळ उठलं आहे.व ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे.हिंगोंलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदार पदाच्या राजीनामा दिल्यानंतर आता यानंतर गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणावरुन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते आता पुढे येत आहेत.सर्व प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी काल राजीनामा दिला आहे.त्यानंतर आज गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठविला आहे.तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अतुल बेनके हे देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपल्या आमदार पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.आता मराठा आरक्षणांचा मुद्दा हा केवळ एका जिल्ह्या पुरते मर्यादित राहिलेला नाही.आता संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज हा पेटून उठला आहे.आता हे आंदोलन निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपले आहे.सत्ताधारी नेतेसह विरोधी पक्षनेते यांना देखील मराठा समाजाच्या आंदोलंकाचा रोषाचा सामना करावा लागत आहे.आता अनेक पक्षातून देखील मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा मोठ्या प्रमाणावर मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.