आज दुपारी परत कॅबिनेटची बैठक : आक्रमक झालेल्या मराठा आंदोलंकानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार यांची उडवली झोप,रात्री उशिरापर्यंत " खलबतं "

पुणे दिनांक ६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झालेला आहे.व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आलेल्या शिष्टमंडळाला आल्या पावली परत दुसऱ्यांदा परत जावं लागले तर उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चार दिवसांचा आल्टीमेटम दिला आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात यांच्यात रात्री उशिरापर्यंत बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते.एकंदरीत आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या वतीने सरकारची झोप उडाली आहे.आज दुपारी पुन्हा मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक होणार आहे.
दरम्यान आज उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा ९ वाढ दिवस आहे.आज त्यांची प्रकृती देखील खालावली आहे.डाॅक्टारांनी त्यांना सलाईन लावले आहे.काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेला शिष्टमंडळाला आल्या पावली परत जावं लागले होते उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपण उपोषणावर ठाम असून जीआर दिल्या नंतरच उपोषण सोडू असं शिष्टमंडळाला ठणकावून सांगितले. व सरकारला पून्हा चार दिवसांचा वेळ वाढवून दिलेला आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिंघांच्यात मराठा समाजाच्या आरक्षण बाबत " खलबतं" झाली आहे.व पून्हा आज दुपारी पुन्हा मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.