माळेगावात पोलिस बंदोबस्त तैनात : मराठा आंदोलंकांच्या विरोधामुळे अजित पवारांनी माळेगावच्या मोळीपूंजन कार्यक्रमास जाणं टाळलं!

पुणे दिनांक २८ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यांचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते बारामती तालुक्यातील माळेगाव येथील साखर कारखान्यांवर मोळी पुंजन कार्यक्रम होता.पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्या वरुन मराठा क्रांती मोर्चांने विरोध केल्यामुळे अजित पवारांनी या कार्यक्रमाला जाण्यांचे टाळले आहे.
दरम्यान माळेगावच्या साखर कारखान्याच्या कार्यक्रमास अजित पवार यांनी जाऊ देणार नाही अशी ठाम भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेतली होती.त्यानंतर अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचा समजते दरम्यान अजित पवार यांच्या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त माळेगाव साखर कारखान्याच्या परिसरात लावला आहे.या बंदोबस्तात पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षकासह एकूण ५००पोलिस यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना गावात फिरु देणार नाही,अशी भूमिका मराठा समाजाच्या आंदोलंकानी घेतली आहे.अजित पवार हे माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने आंदोलंकानी त्यांना विरोध केला होता.या विरोधामुळे अजित पवारांनी कार्यक्रमास जाणे टाळलं.व " स्थानिक शेतकऱ्यांच्या हस्ते मोळीपूंजन करावे" असा निरोप अजित पवारांनी कारखाना प्रशासनाला दिला आहे.व मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.