Politiks : राष्ट्रवादी काँग्रेस वर ताबा घेण्यासाठी अजित पवार अॅकशन मोडवर पदाधिकारी यांना शपथपत्राचे टार्गेट

पुणे दिनांक २८(पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडून शरद पवार यांचा एक गट तर दुसरा गट हा अजित पवार यांचा आता अजित पवार यांच्या गटाने पक्षावर दावा सांगण्यात आला आहे. व हे प्रकरण आता निवडणूका आयोगाकडे गेले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळविण्यासाठी अजित पवार यांनी त्यांच्या गटातील पदाधिकारी यांना शपथपत्र भरून घेण्याचे टार्गेट दिले आहे.
दरम्यान अजित पवार गटांच्या वतीने राष्ट्रवादीचे त्यांच्या गटाचे आजी व माजी नगरसेवक महापौर. तालुका पंचायत समिती. जिल्हा परिषद अध्यक्ष. सदस्य. पंचायत समिती सभापती .सदस्य. बॅकेचे अध्यक्ष. संचालक. ग्राम पंचायत संरपंच व सदस्य. आजी.माजी आमदार व जिल्हा अध्यक्ष. शहर अध्यक्ष. तालुका अध्यक्ष. या सर्व पदाधिकारी यांना शपथ पत्र भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. यात आमदारांना १० हजार शपथपत्र. तर जिल्हा अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांना ५ हजार शपथपत्र असे टार्गेट दिले आहेत.या पक्षातील फूटीचे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले आहे. व त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून कागदपत्राची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.