सकल मराठा समाज आपल्या मुद्द्यांवर ठाम.अजित पवार यांना देखील गावबंदी : माळेगावच्या साखर कारखाना मोळी टाकण्यांच्या सोहळ्यास येण्यास अजित पवारांना विरोध

पुणे दिनांक २७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेला आहे.व यापूर्वी देखील सकल मराठा समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यांतील माळेगावच्या कारखान्यात येऊ नये अशी मागणी कारखाना व पोलिस प्रशासन यांच्याकडे केली होती.त्यावर आज पुन्हा दुपारी सकल मराठा समाज व माळेगावच्या प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्यात चर्चा सुरू असून यावर सकल मराठा समाज हा आपल्या मागणी संदर्भात ठाम आहे.
दरम्यान उद्या बारामती तालुक्यात माळेगावच्या साखर कारखाना . गळीत हंगाम असून यात मोळी टाकण्यांच्या कार्यक्रमाला अजित पवार यांनी येऊ नये म्हणून.मराठा समाज आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन आक्रमक झाला असून संपूर्ण महाराष्ट्रात पुढाऱ्यांना आता गावबंदी करण्यात येत असून . तशीच गावबंदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बारामती मधील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.यापूर्वी देखील माळेगाव साखर कारखाना व पोलिस प्रशासन यांना लेखी निवेदन देण्यात आले होते.आज पून्हा याच प्रकरणी पोलीस व कारखाना प्रशासन यांच्यात बैठक झाली पण मरठा सकल समाज हा आपल्या मुद्द्यांवर ठाम आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.