Ajit Pawar : तर अजित पवारांना पाकिस्तानात पाठवावे- भाजप नेत्याची मागणी

छत्रपती संभाजी महाराजांवरील वक्तव्यावरून राजकारण बरेच तापलेले दिसून येत आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलंय. याचदरम्यान भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अजित पवारांना भारतात राहण्याचा हक्क नसून त्यांना पाकिस्तान मध्ये रवाना करावे असे वक्तव्य केले आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हणा. धर्मवीर म्हणू नका, असं आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. यावरून राज्यात बरीच खळबळ उडाली. यातच नरेंद्र पवार यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच गोंधळ उडाला.
या नेत्याला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहित नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे,असेही ते यावेळी म्हणाले.
अजित पवारांना पाकिस्तानात हाकलून लावण्याची मागणी नरेंद्र पवारांनी यावेळी केली.
पुढे बोलतांना नरेंद्र पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबापुढे गुडघे न टेकता लढत राहिले. धर्म बदलण्यापेक्षा त्यांनी मृत्यू पत्करला म्हणून त्यांना धर्मवीर म्हणून मान्यता आहे असे ते म्हणाले.
या सर्व प्रकरणात आता राष्ट्रवादी नेत्यांची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.