Ajit Pawar : अजित पवारांचा मिश्किल टोला

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यात शिंदे गटावर निशाणा साधला. जे काही आहे ते सगळं आपलंच आहे, असे शिंदे गटातील ४० आमदारांना वाटते. त्यामुळे ते वाटेल ते बोलत असतात. ‘चुन चुन के मारूंगा, अरे तुझ्या घरचं आहे का?’, असा सवालही यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, चार ते पाच लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणारे तुम्ही आमदार आहात, कसं वागलं-बोललं पाहिजे. शिंदे गटातील एका आमदाराने बोलताना असे म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा केला, तशा प्रकारचाच गनिमी कावा हा एकनाथ शिंदे यांनी केला, यावर बोलतानाही अजित पवारांनी मिश्कील भाष्य केले. जेव्हा कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा कळेल काय असतो गमिनी कावा, असे म्हणत खोचक टोलाही लगावला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Pune News, Ajit Pawar News, Pune Politics News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.