विरोधकांवर अजितदादा पवार आक्रमक : आमच्या विरोधकांना चांगल्याच उकळ्या फुटल्यात,काहीही संबंध नसताना आम्हाला ट्रोल करतात - अजितदादा पवार

पुणे दिनांक १५ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आमच्या विरोधात विरोधकांना चांगल्याच उकळ्या फुटल्या आहेत.काहीही संबंध नसताना काहीही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे.व मला ट्रोल केले जात आहे.असे अजितदादा पवार म्हणाले आहेत.दरम्यान कंत्राटी भरती बाबत माध्यमांनी अजित पवार यांना काही प्रश्न विचारले त्यावेळी ते बोलत होते. राज्यात वेगवेगळ्या विभागात एकूण १ लाख ५० हजार मुला मुलींची भरती प्रक्रिया सुरू आहे.पण विरोधक काहीही कारण नसताना चुकीच्या अफवा पसरवत आहेत असे अजितदादा म्हणाले.ते आज सकाळी पुण्यात माध्यमाशी बोलत होते.
दरम्यान याप्रकरणी बोलताना ते म्हणाले मी स्वतः काल आरोग्य विभागाचा आढावा घेत होतो.ज्या ठिकाणी कर्मचारी कमी आहेत.त्याठिकाणी भरती प्रक्रिया सुरू आहे.ज्याठिकाणी शिक्षकांची गरज आहे.त्याठिकाणी सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात घेत आहोत.भरती प्रक्रिया तात्काळ करावी लागते नाहीतर काही जण न्यायालयात जातात असे ते म्हणाले सध्या विरोधक कारण नसताना आम्हाला बदनाम करतात मोठ्या प्रमाणावर १ लाख ५० हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.ही सर्वात मोठी भरती प्रक्रिया आहे.ती यापूर्वी कोणत्याही सरकारच्या काळात झालेली नाही .असा टोलाही विरोधकांना लगावला आहे.
आज व उद्या मंत्रीमंडळ व अधिकारी छत्रपती संभाजी नगर मध्ये आहेत मी आज सायंकाळी संभाजी नगरला जाणार आहे.त्याठिकाणी म्हत्वाच्या मुद्द्यावर चर्चा आहे.सध्या राज्यात पाऊस चांगला पडणार आहे.असा हवामान विभागाच्या वतीने अंदाज वर्तविण्यात आला आहे.तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याबाबत प्रश्न विचारला असता त्यावेळी अजितदादा म्हणाले की निवडणूक आयोगाकडे आम्ही आमची बाजू मांडणार आहे.ज्यांना बोलवण्यात आले आहे ते जातील.व आमची बाजू कशी स्ट्राॅग आहे. ते आम्ही सांगणार असे अजितदादा पवार यावेळी म्हणाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.