Politiks : अमोल कोल्हेची राष्ट्रवादीच्या प्रचार प्रमुखपदी झाली नियुक्ती

पुणे दिनांक ११जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) राष्ट्रवादीत दोन गट पडले असून अजित पवार हे एक गट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली. या सर्व घडामोडी नंतर अमोल कोल्हे.यांनी शरद पवार यांच्या बरोबर राहणार असल्याचे स्पष्ट केल्या नंतर शरद पवार यांनी कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान पुढील काळात येणा-या विधान सभा व लोकसभा निनिवडणूका साठी प्रचाराची धुरा शरद पवार यांनी आता अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर दिली आहे. अजित पवार यांच्या शपथविधी साठी उपस्थित होते. परंतू नंतर त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर राहणार असल्याचे स्पष्ट केले व येवल्याच्या दौ-यात देखील ते शरद पवार यांच्या बरोबर होते. व तिथे त्यांनी सभेत देखील प्रभावी भाषण केले होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.