Pune Shivsena : अनंत घरत यांची शिवसेना पुणे शहर प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती

पुणे, प्रतिनिधी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे शहराच्या प्रसिद्धीप्रमुख पदी अनंत रामचंद्र घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर प्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करताना पक्षाच्या ध्येय धोरणांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करणार असल्याचे घरत यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते खासदार मा. संजयजी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आ. सचिनभाऊ अहिर यांच्या सूचनेनुसार ‘अनंत घरत’ यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन, पुणे शहर “प्रसिद्धी प्रमुख” पदी निवड करण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.