Argument between uncle and nephew : काका-पुतण्या वाद पुन्हा चव्हाट्यावर ?

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. यात पुढे विविध नेत्यांनी आपापले विचार मांडून प्रकरण अजूनच वाढवले. यात भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र पवार, राम कदम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड अश्या बऱ्याच दिग्गजांनी उड्या घेतल्या.
आता नुकतचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
राज्यात धर्मवीर किंवा स्वराज्यरक्षकवरून वाद नको. महापुरुषांवरून अकारण वाद नको.
"छत्रपती संभाजीराजे यांना काहीजण त्यांचे काम म्हणून स्वराज्यरक्षक उल्लेख करतात तर त्याला माझी तक्रार नाही. काही घटक आता धर्मवीर म्हणून उल्लेख करत असतील आणि फक्त धर्माच्या अँगलने विचार करत असतील तर त्यावर माझा काही आक्षेप नाही. त्या व्यक्तीचे ते मत आहे. हे मांडण्याच्या त्याला अधिकार आहे. ज्याला धर्मवीर म्हणायचं आहे त्यांनी धर्मवीर म्हणावे, ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे त्यांनी ते म्हणावं," अशी स्पष्ट भूमिका खासदार शरद पवार यांनी मांडली.
राज्यातील लोकांचे प्रश्न डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे असे ही पवार यावेळी म्हणाले.
त्यांच्या या भूमिकेमुळे काका-पुतण्या वाद परत चव्हाट्यावर आलाय का काय असा प्रश्न उभा राहतो.
असो, महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्या वाद तसा नवीन नाही !
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.