Arvind Kejriwal : मी जर स्क्रीनशॉट शेअर केले तर पंतप्रधान मोदींवर तोंड दाखवायची नम्शूकी येईल अरविंद केजरीवाल चिडले

दिल्लीमधील आम आदमी पक्षाचे आज देशभरामधील " आप " चे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे अधिवेशन पक्षाच्या वतीने आयोजित केले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अधिवेशनात संबोधित करताना त्यांनी भाजपावर चांगलेच तोंडसुख घेतले. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मीडिया सल्लागार हिरेन जोशी यांच्यावर पत्रकार व माध्यमाच्या संपादकांना धमकवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की. हिरेन जोशी हे पंतप्रधान मोदींच्या कार्यालयात मीडिया सल्लागार म्हणून काम करतात. अनेक मोठमोठ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे मालक व संपादकांनी जोशी यांच्या मार्फत आलेले धमकीनचे मेसेज मला दाखविले होते. आम आदमी पक्षांना बातम्यांमध्ये स्थान द्याल तर याद राखा. व आम आदमी पक्षाच्या बातम्या दाखविण्याची काही गरज नाही.. अशा धमक्याच देत आहेत. अशा धमक्या देऊन देश चालणार का? असा सवालच त्यांनी यावेळी केला आहे. केजीवाल पुढे बोलताना म्हणाले की मला जोशींना एकच सांगायचे आहे की. तुम्ही मीडियाला पाठविलेले मेसेज व धमकीचे स्क्रीन शॉट मी सर्वच सोशल मीडियावर टाकले तर. तुम्हाला व पंतप्रधानांना तोंड दाखविण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आता धमक्या देणे पहिले बंद करा.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवाल पुढे म्हणाले की. भाजपा आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. पण आमचे नेते प्रामाणिक आहेत. हे त्यांना माहित नाही. भाजपा ने आधी सत्येंद्र जैन यांना अटक केली. व नंतर आता उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या मागे लागले. पण सिसोदिया यांच्या घरातून त्यांना काही मिळाले नाही. आता पुन्हा ५ ते ६ लोकांच्या घरावर छापेमारी करतील. व नंतर सांगतील त्यांना त्यांच्या साथीदाराकडून सर्व काही मिळाले असे ते यावेळी म्हणाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.