सुरक्षा रक्षक अधिकाऱ्यांनी मंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी : मंत्रालयाच्या मुख्य गेटवर शिवसेना आमदारांच्या कारला प्रवेश नाकारताच आमदारांचा गेटवर थयथयाट

पुणे दिनांक २० ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मंत्रालयाच्या गेटवर सुरक्षा रक्षक यांनी शिवसेना आमदार महाशयां ची कारला आत प्रवेश न दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेना आमदार संजय क्षिरसाट यांचा पारा प्रचंड प्रमाणात वाढला व त्यांनी आपली कार मंत्रालयाच्या गेटवरच बराच वेळ थांबवली व तिथेच थयथयाट सुरू केला.सदरची घटना ही काल दुपारच्या वेळेस घडली आहे.
दरम्यान काल गुरुवारी दुपारी मंत्रीमंडळांची बैठक मंत्रालयात सुरू होती व शिवसेना आमदारांना त्यांच्या मतदार संघातील कामा संदर्भात संबंधीत खात्याच्या मंत्र्यांना भेटायचे होते.दरम्यान यापूर्वी काहीच दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता की.संबधित गेटने फक्त मंत्रालयाच्या मुख्य गेटवरुन फक्त मंत्र्यांच्या कारला प्रवेश दिला जाईल त्यानुसार गेटवरुन सुरक्षा रक्षक यांनी या आमदार महाशयांची कार अडविली त्यामुळे या आमदार यांचा प्रचंड प्रमाणावर पारा चढला व तिथेच गेटवर आपली कार काही काळ थांबविली व नंतर सुरक्षा रक्षक यांच्या वरिष्ठ अधिकारी यांनी गेटवर येऊन या आमदार महाशयांची समजूत काढली व त्यानंतर आमदार महाशयांची कार अखेर त्याच गेटने आत गेली व गोंधळ एकदाचा थांबला परंतु याबाबत सुरक्षा रक्षक यांनी मंत्र्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.सदर प्ररकणी मराठी वाहिनी एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.पण याबाबत मंत्रालयाच्या सर्वच मंत्री आणि आमदार यांच्यात याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.