Chandrakant patil : पालकमंत्री चंद्रकांत पाटील येताच डीजे वर वाजलं " राष्ट्रवादीचे प्रचार गीत डिजे वाला गेला बाराच्या भावात"

आज २८ ऑक्टोबर पुण्याचे पालकमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री पुण्यात होते. ते एका आयोजित कार्यक्रमासाठी गेले असता. त्यांचा प्रवेश कार्यक्रम स्थळी होताच एकदम मोठ्या आवाजात डीजे वर गाणे लागले." राष्ट्रवादी पुन्हा..." हे सगळं घडलं अचानक पणे. पोलीस यंत्रणा एकदम ॲक्शन मोडमध्ये येऊन डीजे वाले लाच घेतलं ताब्यात.?
पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे आज दीपावली सणानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात रास्ता पेठ येथे आली होते.
परंतु त्यांचे आगमन स्थळावर होताच तिथे उपस्थित असलेल्या डीजे चालकाने अचानकपणे मोठे आवाजात राष्ट्रवादी पक्षाने आपली प्रचार गीत केलेले गाणे " राष्ट्रवादी पुन्हा.." हे प्रचार गीत एकदम अचानकपणे लावल्याने उपस्थित कार्यक्रम कार्यकर्ते एकदम गोंधळले स्थळी थोडा गोंधळ झाला मात्र या सर्व प्रकरणानंतर पोलीस यंत्रणा चांगलीच ॲक्शन मोडमध्ये येऊन त्यांनी डीजे चालकाला ताब्यात घेतले आहे व डीजे चालकाने पोलिसांकडून अधिकृत परवानगी घेतली नाही असा त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. " तू पोलिसांकडून अधिकृत परवाना घेतला नाही. म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे." परंतु डीजे वाल्याने राष्ट्रवादीचे प्रचार गीत लावल्यामुळे डीजे वाला गेला बाराच्या भावात" अशी चर्चा संपूर्ण रास्ता पेठ व सोमवार परिसरात रंगली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.