Politiks : आपल्या प्रभागामधील कामे होत नाही म्हणून कार्यलयातच नगरसेवकांने चप्पलने स्वातांचे तोंड घेतले झोडून

पुणे दिनांक २ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) आंध्र प्रदेश मधील अनकापल्ले जिल्ह्यातील एका तरूण नगरसेवक यांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीया वर चांगलाच व्हायरल होत आहे. या मध्ये नगरपालिकेच्या नगरसेवाकांच्या कौन्सिल बैठकीतच स्वताला आपल्याच चप्पलने तोंड झोडून घेताना या व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
दरम्यान हि घटना आंध्रप्रदेश मधील अनकापल्ले जिल्ह्यातील नरसिपट्टणम नगरपालिका मधील प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेवक मुलापार्थि रामराजू यांनी आपल्या प्रभागात कामे होत नसल्या मुळे प्रचंड प्रमाणावर चिडले होते .कामे होत नसल्या मुळे त्यांनी मतदार यांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता पूर्ण होत नाही. या कारणामुळे त्यांनी स्वतःला चप्पलने तोंड झोडून घेतले .व या बैठकीत त्यांनी माइकही फेकून दिला.या घटने बाबत माध्यमांशी बोलातांना या नगरसेवक रामराजू यांनी सांगितले की मला प्रभाग क्रमांक २० मधून नगरसेवकपदी मतदार यांनी निवडून दिले .याला आता एकंदरीत ३१ महिने झाले आहेत. पण मला माझ्या प्रभागामधील अंत्यत म्हत्वाची कामे मार्गी लावता येत नाही. यात ड्रेनेज .वीज.स्वच्छता. रस्ता. इतर समस्या सोडवता आल्या नाहीत.
दरम्यान रामराजू हे ४० वर्षीय असून ते एक रिक्षाचालक आहेत. मी माझ्या प्रभागामधील कामासंदर्भात नगरपालिका प्रशासनाकडे पाठपूरवठा केला पण प्रशासन माझ्या प्रभागामधील कामाला केराची टोपली दाखवत होते. म्हणून मला हे पाऊल उचलावे लागले.रामराजू यांना टीडीपीने पाठिंबा दिला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.