मराठा आंदोलन निर्णायक टप्प्यावर : मराठा आरक्षणासाठी बळीराजा देखील मैदानात; जरांगे पाटील यांना पाठिंब्यासाठी पंढरपूर ते अंतरवली सराटीत १२ शेतकरी हे बैलगाडीतून होणार दाखल

पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे २५ ऑक्टोबर पासून अंतरवली सराटीत उपोषण करत असून त्यांचा आज उपोषणांचा पाचवा दिवस आहे.दरम्यान पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरच्या चळे गावातील बारा शेतकरी यांनी बैलगाडीतून यात्रा काढत जरांगे पाटील यांच्या उपोषणांला पाठिंबा देण्यासाठी रवाना झाले आहेत.
दरम्यान उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणांला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.दरम्याण पंढरपूर मधून चळे गावातील बारा शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीमधून मात्र काढत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी रवाना झाले आहेत.राज्य सरकारला शेतकरी हाच कुणबी मराठा आहे .हे दाखवून देण्यासाठी बैलगाड्या घेऊन ह्या शेतकरी यांनी पंढरपूर ते अंतरवली सराटी याठिकाणी निघाले आहेत.भूम शहरात हे शेतकरी दाखल झाल्यानंतर शहरातील मराठा बांधवांनी या शेतकरी यांचे हलगी व ढोल 🥁 ताशा वाजवून जोरदार स्वागत केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.