Politiks : ' भिडे हा जातीय द्वेष पसरविणारा साप '; विरोधीपक्ष नेत्याची टीका

पुणे दिनांक १ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) शिवप्रतिस्ठाचे अध्यक्ष संभाजी भिडें यांनी अमरावती मध्ये महात्मा गांधी बाबत वादग्रस्त विधान केल्यांने राज्यभर पडसाद उमटले होते. व बाबत काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी राज्यात आंदोलने केली. यावर पावसाळी अधिवेशनात देखील पडसाद उमटले. विरोधकांनी सरकारला घेरण्याचे काम केले. या बाबत भिडें यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्या नंतर आता नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भिडें यांच्यावर जोरदार टीका केली आहे यावेळी भिडें गुरूजीला चोप दिला पाहिजे. कितीही शिक्षा झाली तरी चालेल. हा चंड माणूस असून तो जातीय द्वेष पसरविणारा साप आहे.भिडें याला नाग म्हणणं हा देखिल नागाचा अपमान असल्याची जहरी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.