Politiks : जेष्ठ नेते शरद पवार यांच्या समोर मोठा पेच , १ ऑगस्टला ' पुणे का दिल्ली ' नक्की काय भुमिका घेणार ?

पुणे दिनांक २९ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्कार समारंभाला जेष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. १ ऑगस्टला पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व जेष्ठ नेते शरद पवार हे एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.या कार्यक्रमाला शरद पवार हे प्रमुख पाहुणे राहणार असून त्यांनी या बाबत शब्द दिल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले आहे. तर याच दिवशी दिल्लीत १ किंवा २ ऑगस्टला राज्यसभेत दिल्लीचे विधेयक येण्याची शक्यता आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिल्लीत उपस्थित राहून विधायेकाविरोधात मतदान करावं , असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलयं.त्यामुळे आता शरद पवार यांच्या पुढे नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
दरम्यान राज्यसभेत १ किंवा २ ऑगस्टला राज्यसभेत दिल्लीचे विधेयक येण्याची शक्यता आहे. या विधेयकाला ' आप ' कडून जोरदार विरोध करण्यात आला आहे.
सर्व विरोधकांनी एकत्र येऊन पाठिंबा द्यावा. अशी विनंती अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. शरद पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमाला जाऊ नये. व सभागृहात उपस्थित राहून व विरोधात उपस्थित राहून विरोधात मतदान करावं .असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
आता यावर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित पुण्यात राहतात का. अरविंद केजरीवाल यांच्या साठी दिल्लीला जातात .? हे पाहणं औस्तुक्याचे ठरणार आहे. दरम्यान या पुण्यातील कार्यक्रमात शरद पवार. नरेंद्र मोदी. व राज्यचे उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस. हे एकाच मंचावर एकत्र येणार असल्याचे मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे.व कदाचित या कार्यक्रमा साठी राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील येण्याची शक्यता आहे. त्या मुळे आता पुढे काय -काय घडतं ? हे पाहणं देखील महत्त्वाचे आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.