राजकारण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले बबन गित्तेंना मोठे बक्षीस

पुणे दिनांक २९ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशावेळी बबन गित्तेंनी मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बबन गित्तें यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बबन गित्तें यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करत त्यांना या निवडीचे पत्रक त्यांना देण्यात आले आहे.
दरम्यान बीडमध्ये राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशावेळी बबन गित्तेंनी मोठे शक्तिप्रदर्शन केले होते.बीड जिल्ह्यात बबन गित्तें यांची मोठी ताकद आहे.मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी आता स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत.त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे ठरविले आहे.व तशी प्रथम सुरुवात येवला येथून केली व नंतर बीड , तसेच कोल्हापूर याभागात सभा घेत रणनीती करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान अजित पवार यांना धनंजय मुंडे यांनी साथ देत सरकार मध्ये सहभागी झाले त्यामुळे बीडमध्ये पक्षाला काही प्रमाणात फटका बसला आहे.त्यासाठी शरद पवार यांनी बबन गित्तें यांना बीडमध्ये मोठी ताकद देत डायरेक्ट पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.